शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गर्दी पांगविणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:41 IST

देवळाली कॅम्प परिसरात शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौकात झालेली गर्दी पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई मनोहर साळुंखे तर पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. 

ठळक मुद्देदेवळाली कॅम्प : दोघे जखमी; भगूरला धारदार शस्त्राने हल्ला

देवळाली कॅम्प : परिसरात शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौकात झालेली गर्दी पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई मनोहर साळुंखे तर पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथे दोघा पोलिसांवर दगडफेक करून संशयित समाजकंटकांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आहेर, साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आहे. दोघांना उपचारासाठी देवळाली छावणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या समाजकंटकांना पांगविण्यासाठी पोलिसांना पुन्हा एकदा बळाचा वापर करत गर्दी पांगवावी लागली. याप्रकरणी चारणवाडी येथून संशयित शंकर सुरेश देवकर, श्रावण माने, रोहित कुसमाडे, दीपक नलावडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित नऊ  संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यात एकूण १४ संशयितांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल माजवून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचविण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हाणामारीच्या घटनेत एक जण गंभीरn भगुर येथेही रात्री अकरा वाजेच्यादरम्यान गायकवाड गल्लीत सेल्फी काढताना धक्का लागल्याचा राग आल्याने दोन युवकांमध्ये वाद निर्माण झाला. एकाने धारधार वस्तू काढून दुसऱ्याच्या डोक्यावर मारली. n  या घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली असून संशयिताने घटनास्थळावरून पळ काढल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद होऊ शकलेली नाही.तत्काळ पोलीस बंदोबस्त तैनातया घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विजय खरात व सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी