भेगू प्रकल्पाच्या तळमोरीत दगडधोंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:26+5:302021-06-17T04:11:26+5:30
सन २०१७-१८ पासून भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या तळमोरीमध्ये दगडधोंडे पडल्यामुळे प्रकल्पाच्या व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर येत नाही. या प्रकल्प लाभक्षेत्रातील २० ...

भेगू प्रकल्पाच्या तळमोरीत दगडधोंडे
सन २०१७-१८ पासून भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या तळमोरीमध्ये दगडधोंडे पडल्यामुळे प्रकल्पाच्या व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर येत नाही. या प्रकल्प लाभक्षेत्रातील २० गावांत पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होत नसल्याने या प्रकल्पाच्या दुरुस्ती कामासाठी आमदार नितीन पवार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले होते व दुरुस्ती काम तात्काळ करण्याची मागणी केली होती.
भेगू प्रकल्पात ढासळणारे दगड, मुरूम तळमोरीजवळून बाजूला करून कालव्याची दुरुस्ती करावी, धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य गेट नादुरुस्त असून, त्याच्या दुरुस्तीचे काम यांत्रिकी विभागाने तत्काळ करावे व प्रकल्पाच्या मुख्य भिंतीसाठी गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचना पवार यांनी पाहणी दौऱ्यात केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती मधुकर जाधव, उपअभियंता वैशाली ठाकरे, मोरे, शाखा अभियंता गावित, गटविकास अधिकारी डी. ई. जाधव, बांधकाम उपअभियंता के. एल. चव्हाण, ग्रामसेवक दयाराम ठाकरे आदी उपस्थित होते.
इन्फो
जलसंपदामंत्र्यांकडून दखल
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भेगू आणि धनोली येथील दुरुस्तीचे काम हाती घेण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने अथक प्रयत्नातून व्हॉल्व्हमधून पाणी काढण्यात यश मिळविले. प्रकल्पातील पाणी पूर्णपणे काढण्यात आल्यानंतर दगडधोंडे पडून गाळ साचल्यामुळे पोकलेनच्या साहाय्याने तळमोरी, व्हॉल्व्ह आदी ठिकाणची साफसफाई करण्यात आली.
फोटो - भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करताना आमदार नितीन पवार, विजय शिरसाठ, मधुकर जाधव व ग्रामस्थ.
===Photopath===
160621\16nsk_35_16062021_13.jpg
===Caption===
फोटो - भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करतांना आमदार नितीन पवार, विजय शिरसाठ, मधुकर जाधव व ग्रामस्थ