उंटवाडीत धावत्या कारने घेतला पेट; अनर्थ टळला
By Admin | Updated: January 22, 2017 00:15 IST2017-01-22T00:14:53+5:302017-01-22T00:15:06+5:30
चालकाचे प्रसंगावधान : नागरिकांची उडाली धावपळ

उंटवाडीत धावत्या कारने घेतला पेट; अनर्थ टळला
सिडको : येथील उंटवाडी रोडवर धावत्या इस्टीम कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी (दि़२१) सायंकाळच्या सुमारास घडली़ मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत कुटुंबीयांना त्वरित खाली उतरविल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला़ दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर येथील रहिवासी संजय पंढरीनाथ मोकाशी हे कुटुंबीयांसह शनिवारी सायंकाळी आपल्या इस्टीम कारने (एमएच ०२, वाय ३२१६) उंटवाडी परिसरातून जात होते़ या दरम्यान अमोल टॉवरजवळ कारच्या इंजिनमधून धूर निघू लागल्याने मोकाशी यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेऊन कारमधील कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले व कारने पेट घेतला़ अचानक घडलेल्या घटनेमुळे मोकाशी परिवार घाबरला होता़ (वार्ताहर)