नाशिक : सराफी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवाजीनगरमधील नरसिंह ज्वेलर्समध्ये घडली आहे़शिवाजीनगर येथील नितीन दिलीप दाभाडे (३१, रा. राजनदीनी व्हीला) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २९ व ३० जून या कालावधित चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला़ तसेच दुकानातील १ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये सोन्याचे झुबे, सोन्याची कान साखळी, सोन्याची पोत, सोन्याची साखळी, सोन्याचे डोरले, सोन्याची कुडके, सोन्याची बुगडी, सोन्याचे मणी, चांदीचे बाजूबंद, चांदीची तार, चांदीचे पायल बॉक्स, गाडीचे कागदपत्र, बँकेचे चेक यांचा समावेश होता़याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
सराफी दुकान फोडून दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:12 IST