घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:19 IST2018-12-09T01:17:19+5:302018-12-09T01:19:47+5:30

सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करून मध्य प्रदेशात जाऊन मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना तीन दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून पथकाने शाखेने अटक केली आहे. दोघांना ताब्यात घेतले आहे.

Stolen gangsters arrested for burglary | घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यांना अटक

सिन्नर शहर व उपनगरात घरफोड्या करणाऱ्या संशयिताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यात जाऊन अटक केली. संशयित आरोपींसह पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्यासह कर्मचारी.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशात पथक पाठविले होते.


सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करून मध्य प्रदेशात जाऊन मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना तीन दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून पथकाने शाखेने अटक केली आहे. दोघांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशात पथक पाठविले होते. धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यात सिंगाचोरी गावात सदर गुन्हेगार वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर पथकाने सापळा रचला. यातील संशयित ठाकूर ऊर्फ कालू हारु मंडलोई (२३) व करमसिंग कालू भुरीया (३२) यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांची नावे सांगण्यासह सिन्नर शहर, शिवाजीनगर, सरदवाडी रोड, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योगभवन या सहा ठिकाणी बंद घरांवर पाळत ठेवून चोºया केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार दिलीप घुले, प्रकाश चव्हाणके यांनी कामगिरी केली. अटक करण्यात आलेले आरोपी साथीदारांसह पाळत ठेवून कडीकोयंडा तोडून घरफोड्या करीत. घरफोड्या केल्यानंतर शिर्डी गाठून एम. पी. पासिंगच्या वाहनांना हात देऊन ते धार जिल्ह्यात पळून जात होते. गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल मध्य प्रदेश राज्यातील आलीया राजपूर जिल्ह्यातील बोरी येथील व्यापाºयास विक्री करीत होते.

Web Title: Stolen gangsters arrested for burglary