कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:08 IST2020-02-11T00:27:56+5:302020-02-11T01:08:20+5:30

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.

Stocks to lift onion export ban | कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे


विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देताना भारत दिघोळे, सोमनाथ गिते, शैलेंद्र पाटील, अमोल गोर्डे, भीमचंद पालवे, महादेव जायभावे, बी. टी. दिघोळे आदी.

नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.
गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने मागील काही दिवसांपासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वात जास्त कांदा उत्पादक महाराष्ट्रात असून, येथे चांगल्या पद्धतीने कांदा उत्पादन होते. असे असतानाही महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यातबंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेशी वारीसाठी मुक्त केले पाहिजे. राज्य सरकारने याबाबत लक्ष घालून केंद्र सरकारकडून तत्काळ निर्यात खुली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भारत दिघोळे, सोमनाथ गिते, शैलेंद्र पाटील, अमोल गोर्डे, भीमचंद पालवे, महादेव जायभावे, आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Stocks to lift onion export ban