शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चाळीत साठवलेल्या कांद्यालाही बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:25 IST

नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदयाची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल २५१२ रुपये भाव मिळाला.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा : बाजार समित्यांमध्ये आवक वाढली

नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदयाची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल २५१२ रुपये भाव मिळाला.कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालूवर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकण्यापर्यंत तसेच लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरूवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र, त्यावेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगण्याआधीच खराब झाली होती.परिणामी दुसर्‍यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती. परंतु बहुतांश कंपन्यांचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरित परिणाम झाला होता. गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसात करपा रोगाने थैमान घातले.चालू वर्षी उन्हाळी कांदा उत्पादनात घट आली असतानाच उरलेल्या कांद्यांना आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता. परंतु आधीच गारपीट व करपा रोगाने हा कांदा बाधित असल्याने चाळीत टाकून एक ते दीड महिनाही होत नाही तोच चाळीत साठवणूक केलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. उमराणे येथे सोमवारी (दि. ३१) कांदा कमीत कमी ९०० रुपये, जास्तीत जास्त २१५१ रुपये, तर सरासरी १६०० रुपये दराने विकला गेला.उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारभाव वाढेल, या अपेक्षेने चाळीत कांदा साठवणूक केला होता. मात्र, कांदा रोगाने बाधित झाल्याने चाळीतील कांदा लवकर खराब होऊन तो नाईलाजास्तव विक्री करावा लागत आहे.- संभाजी देवरे, शेतकरी, उमराणे 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड