टाकळी रस्त्यावर दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:47+5:302021-06-09T04:17:47+5:30
नाशिक : जेलरोड येथील सैलानी बाबा चौकात खोदकाम करण्यात येत असल्याने येथील पेव्हरब्लॉक उखडले आहे. खोदकामामुळे वाहनधारकांनादेखील अडचणींचा सामना ...

टाकळी रस्त्यावर दुर्गंधी
नाशिक : जेलरोड येथील सैलानी बाबा चौकात खोदकाम करण्यात येत असल्याने येथील पेव्हरब्लॉक उखडले आहे. खोदकामामुळे वाहनधारकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागत असून रस्ता तातडीने दुरूस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
शिष्यवृत्तीची प्रतीक्षा
नाशिक : दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया कोरोनामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. सध्या ऑनलाईन वर्ग सुरू असून शिष्यवृत्ती देण्याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
पदपथावर दुकाने
नाशिक : जेलरोड येथील लोखंडे मळा परिसरात नव्यानेच पदपथ उभारले आहेत. या मार्गांवर भाजीबाजार असून विक्रेत्यांनी आपली दुकाने पदपथावर थाटली आहेत. यामुळे पदपथ कुणासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लसीकरणासाठी रांगा
नाशिक : उपनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. या केंद्रात उपनगरसहीत टाकळी, नाशिकरोड, जेलरोड, जयभवानी रोड येथील नागरिक लसीकरणासाठी येत असतात.