स्टेरॉइड, सीटीस्कॅनचे कोरोना रुग्णांवर होऊ शकतात दुष्परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:00+5:302021-05-05T04:24:00+5:30
शहरात कोराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मात्र आता या संसर्गाबाबतदेखील नागरिक सजग झाले आहेत. शिवाय रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल ...

स्टेरॉइड, सीटीस्कॅनचे कोरोना रुग्णांवर होऊ शकतात दुष्परिणाम
शहरात कोराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मात्र आता या संसर्गाबाबतदेखील नागरिक सजग झाले आहेत. शिवाय रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल करायचा असेल तर त्यावरदेखील तत्काळ सीटी स्कॅन केले काय, स्कोर किती? असा प्रश्न केला जातो. त्यामुळे सर्रास निदान करण्यासाठी स्कॅनिंग केले जाते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनीदेखील सीटीस्कॅन धोकादायक असल्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे स्कोर अधिक असेल तर रुग्णांना बरे वाटावे यासाठी वैद्यकीय उपचारात स्टेरॉईडचा वापर सहज केला जातो. त्याचा सुरुवातीला परिणाम जाणवला नाही तरी रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याचे अनेक दुष्परिणाम आराेग्यावर जाणवतात, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
इन्फो..
बुरशीजन्य आजारांचा धोका
१ कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी स्टेरॉडइचा वापर केला किंवा काही महागड्या इंजेक्शनचा वापर केला तर रुग्ण वाचतो. मात्र अन्य व्याधींना सामोरे जावे लागते.
२ म्युकॉर्मायकॉसीस म्हणजेच बुरशीजन्य आजार सध्या फैलावत आहेत. डोळ्याजवळ किंवा नाकाजवळ, मूत्रपिंड तसेच अगदी मेंदूवरही त्याचा आघात होतो आणि रुग्णाच्या जिवावर बेतू शकते.
इन्फो..
१२०० सीटीस्कॅन होतात दररोज
१ काेराेनामुळे सध्या संसर्ग झाल्यास तत्काळ रुग्ण सीटीस्कॅन करतात. त्यामुळे दररोज किमान १२०० सीटीस्कॅन होतात अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
२ शहरात एकूण वीस सीटीस्कॅन सेंटर आहेत, तर शासकीय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयातदेखील सीटीस्कॅन केले जाते.
३ रुग्णांचा स्कोर कमी असेल तर संबंधित रुग्णालयात दाखल होत नाही. मात्र, स्कोर अधिक असेल तर मग मात्र रुग्ण उपचारासाठी दाखल होतो.
इन्फो...
एक सीटीस्कॅन म्हणजेच २५० ते ३०० एक्स-रे
एक सिटी स्कॅन म्हणजे पूर्वी तीनशे ते चारशे एक्स-रे असे गणित होते. मात्र आता त्यात बदल झाला असून, एक सीटीस्कॅन म्हणजेच अडीचशे ते तीनशे एक्स-रे असे गणित आहे. सध्याची सर्व उपकरणे अत्यंत सुरक्षित आहेत. त्यामुळे रेडिएशनचा धोका अत्यंत कमी असतो असे स्थानिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोट...
सध्या कोरोनाचे निदान झाल्यावर संसर्गाची तीव्रता किती हे तपासण्यासाठी सीटीस्कॅन उपयुक्त ठरत आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्याने तीव्र लक्षण असतील , तर स्कॅन करण्यास हरकत नाही. नवीन सीटीस्कॅनमुळे आता रेडिएशन अत्यल्प प्रमाणात हेाते. त्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो असे म्हणणे संयुक्तिक नाही.
- डॉ. मंगेश थेटे, विभागीय प्रमुख, संदर्भ सेवा रुग्णालय