चांदवड पोलीस ठाण्यात निर्र्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:17 IST2020-07-12T23:01:23+5:302020-07-13T00:17:50+5:30
चांदवड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

चांदवड पोलीस ठाण्यात निर्र्जंतुकीकरण
चांदवड : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी तालुक्यातून नागरिक येतात. त्यांच्या तोंडाला मास्कही नसते, कोण कोठून आले यांची कल्पना नसते ही बाब लक्षात घेऊन चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी पोलीस स्टेशन व आवारात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी नगर परिषदेकडे केली होती. मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जंतुनाशक फवारणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
येथील कोविड सेंटरमधील कारोनायोध्दा डॉक्टर, परिचरिका, कर्मचारी यांचा सत्कार प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते प्रत्यक्ष कोविड सेंटरमध्ये जाऊन पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ, भेटवस्तु देऊन केला. चांदवड येथील कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या साथीमध्ये अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सामना करुन आपल्या जीवाशी खेळून कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णांची सेवा करणाºया सर्व कोरोना योध्दाचे मनोबल वाढवावे म्हणून सदरचा सत्कार करीत असल्याचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी सांगीतले. तर त्यांनी केलेल्या रुग्ण सेवेमुळे व चांगल्या कामकाजामुळे चांदवड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे प्रांत भंडारे यांनी सांगीतले.