भाम धरण १०० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:51 IST2019-07-29T14:50:44+5:302019-07-29T14:51:15+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात आज २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत २ हजार ३२७ मिमी पाऊस झाला असून सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे.

भाम धरण १०० टक्के भरले
घोटी : इगतपुरी तालुक्यात आज २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत २ हजार ३२७ मिमी पाऊस झाला असून सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. भावली धरणाच्या पाठोपाठ भाम धरण १०० टक्के भरले आहे. पाऊस सुरूच असल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ह्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरण्याचा अंदाज आहे. मुबलक पाण्यामुळे भात लावणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. घोटी बाजारपेठेला आज सुटी असूनही शेतकर्यांनी साहित्य खरेदी साठी गर्दी केली. नैसिर्गक धबधबे आण िपर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दीही झाली आहे.