मालेगावी सराफ दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:37 IST2019-03-24T18:35:39+5:302019-03-24T18:37:07+5:30

मालेगाव येथील सटाणा रोडवरील शिवाजी रामचंद्र ज्वेलर्स या सराफी पेढीतून दोन अज्ञात महिलांनी दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने २१ ग्रॅमची ६७ हजार २०० रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली.

Stealing in the Malegaon braces | मालेगावी सराफ दुकानात चोरी

मालेगावी सराफ दुकानात चोरी

मालेगाव : येथील सटाणा रोडवरील शिवाजी रामचंद्र ज्वेलर्स या सराफी पेढीतून दोन अज्ञात महिलांनी दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने २१ ग्रॅमची ६७ हजार २०० रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. या प्रकरणी दुकानदार राजेंद्र शिवाजी पवार (४९), रा. संगमेश्वर यांनी छावणी पोलिसांत फिर्याद दिली.
दोन अज्ञात महिला अनोळखी लहान मुलांसह सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या. दुकानातील कर्मचारी कैलास आहेर त्यांना सोन्याची चेन दाखवत असताना दोघा महिलांनी एक चेन लंपास केली. शुक्रवारी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहताना हा प्रकार उघडकीस आला. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stealing in the Malegaon braces