सातपूर येथील आयटीआयमध्ये चोरी

By Admin | Updated: September 4, 2014 00:44 IST2014-09-04T00:40:51+5:302014-09-04T00:44:13+5:30

सातपूर येथील आयटीआयमध्ये चोरी

Stealing ITI in Satpur | सातपूर येथील आयटीआयमध्ये चोरी

सातपूर येथील आयटीआयमध्ये चोरी

 

नाशिक : सातपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वेल्डिंग विभागातील वेल्डिंग मशीन व इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत संजय शंकरराव कोकुळकर हे अहमदनगरच्या शासकीय आयटीआयमध्ये सुरू असलेल्या परीक्षेसाठी गेले होते़ या दरम्यान चोरट्यांनी अ‍ॅडव्हान्स वेल्डिंग विभागातील दरवाजाचे लोखंडी ग्रीलच्या दरवाजास लावलेले लॉक तोडून आतील वेल्डिंग मशीन, कटिंग मशीन व इतर साहित्य असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Stealing ITI in Satpur