वृंदावन नगरमध्ये किराणा दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:49 IST2018-12-18T17:49:34+5:302018-12-18T17:49:47+5:30
सिन्नर : सरदवाडी रोड परिसरातील वृंदावन नगरमधील वज्रेश्वरी किराणा व जनरल स्टोअर्सच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली.

वृंदावन नगरमध्ये किराणा दुकानात चोरी
सिन्नर : सरदवाडी रोड परिसरातील वृंदावन नगरमधील वज्रेश्वरी किराणा व जनरल स्टोअर्सच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली.
अज्ञात चोरटयांनी गल्ल्यातील ३६०० रूपयांची रोकड व १८०० रूपये किंमतीचे सिगारेटस् व बिडया चोरून नेल्या आहे. राहुल भानुदास लोणारे हे शनिवारी रात्री १० च्या दरम्यान दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी दुकानात आल्यानंतर चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेल्या चिल्लरसह रोख ३६०० रूपये तसेच चोरटयांनी दुकानातील गोल्ड प्लॅग सिगारेटची ६ पॅकेटस व बिडीची ८ बंडल्स असा १८०० रूपयांचा ऐवजही चोरून नेला असल्याची तक्रार लोणारे यांनी पोलीस ठाण्यास दिली आहे. पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.