शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

भादवण येथे भरदिवसा चोरी;

By admin | Updated: July 29, 2014 00:55 IST

चार तोळे सोने लंपास

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण येथे भरदिवसा अज्ञात चोरट्याने जबरीने घरात प्रवेश करून चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रुपये चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या सदरील घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलीसांच्या कार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. भादवण येथील शेतकरी प्रकाश जाधव हे पत्नीसह त्यांच्या व्याह्याकडे बाहेरगावी गेले होते तर मुलगा मित्रासमवेत सप्तशृंगी गडावर गेला होता. पिळकोस - बगडू रस्त्यावरील पुलालगत असलेल्या जाधव यांच्या मळ्यातल्या घरात त्यांची आई सिंधुबाई याच एकट्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक भामटा मोटारसायकलवर आला, आणि त्यांच्या मुलाचा मित्र असल्याचे सांगत त्यांचे काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातल्या कपाटा असून ते घेण्यासाठी पाठविल्याचे सिंधुबाई यांना सांगितले. तरीही सिंधुबाई यांनी त्यास कपाटाकडे जाण्यास मज्जाव केला असता त्याने त्यांनाच लगतच्या खोलीत डांबले आणि कपाटाचे लॉकर तोडून आतील चार तोळे सोन्याचे दागिने, रोख दहा हजार रुपये घेऊन पलायन केले. सदर घडलेला प्रकार सिंधुबाईनी शेजारील मळ्यातील शेतकऱ्यांना सांगितल्यावर घटनेची उकल झाली. प्रकाश जाधव यांना भ्रमणध्वनीवरून सदरची घटना कळविण्यात आली. याबाबत कळवण पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.