Steal an onion on a sheep kiln | भेळ भत्त्यावर ताव मारून ४० गोणी कांद्याची चोरी

भेळ भत्त्यावर ताव मारून ४० गोणी कांद्याची चोरी

जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे कांद्यासोबत भेळ भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी ४० गोणी कांदा चोरून नेला, त्यामुळे शेतकऱ्याला सुमारे एक लाख २५ हजार रूपयांचा फटका बसला. आधीच अवकाळी पावसाच्या माºयाने हैराण असलेल्या शेतक-याला चोरट्यांच्या या कारणाम्यामुळे जवळपास भुर्दंड बसला आहे. कांद्याचे वाढलेले दर चोरट्यांना पर्वणी ठरत असून, चोरट्यांनी आता आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे. बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रावेर शिवारातुन मुस्ताक इसाक शेख यांच्या कांदा चाळीतून जवळपास १ लाख २५ हजार रु पये किमतीचे कांदे चोरट्यांनी लांबविल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद- अंतापुर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. यात त्यांनी काही कांदा राखून ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम सोबत आणलेल्या भेळ भत्त्यावर कांद्याबरोबर ताव मारला व नंतर चाळीत साठवून ठेवलेल्या ६२ गोणींपैकी ४० गोणी कांदा सोबत आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला. दुसºया दिवशी सकाळी शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी व कुलूप तोडून कांद्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खाल्लेल्या भत्यातील मुरमुरे व कांद्याची टरफले येथे पडलेली त्यांना आढळून आली. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. याआधी अंतापुर- मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर ३४७ मध्ये उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी , संजय पानपाटील यांच्या विस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल ,यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य, चोरीस गेले आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले असतांनाच चोरटे आता कांदे व शेतीउपयोगी साहित्य व उत्पादने चोरी करू लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Web Title: Steal an onion on a sheep kiln

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.