पूर्वीच्या ठिकाणी पुतळा बसवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:56+5:302020-12-05T04:21:56+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकसमेारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मूळ जागेवर बसविण्याची मागणी महाकर्मभूमी बुद्धविहार समितीच्या वतीने करण्यात आली ...

पूर्वीच्या ठिकाणी पुतळा बसवावा
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकसमेारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मूळ जागेवर बसविण्याची मागणी महाकर्मभूमी बुद्धविहार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिकरोड येथील रेल्वेस्थानकासमोर डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. रस्त्याच्या मधोमध हा पुतळा असून, पुतळ्याला वळसा घालून वाहने जा- ये करतात. पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेता पूर्वीच्याच जागेवर पुतळा बसवून पुतळ्याचे संरक्षण करावे, अशी मागणी महाकर्मभूमी बुद्धविहार समितीच्या वतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
महाकर्मभूमी बुद्धविहार समितीच्या वतीने महापालिका आमदार राहुल ढिकले, मनपा आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिकरोड रेल्वेस्थानकाजवळ रस्त्याच्या एका बाजूला असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मूळ जागेवरून समोरच रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आला. रस्ताच्या मध्यभागी पुतळा उभारल्यानेे रहदारीस अडथळा होत आहे. वाहनांची गर्दी आणि रस्त्यावरून उडणारी धूळ यापासून पुतळ्याचे संरक्षण होण्यासाठी पुतळा मूळ जागी बसविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर बौद्धविहार ट्रस्टचे अध्यक्ष विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, अमोल घोडे, चावदास भालेराव, संतोष धोत्रे, बाळासाहेब पगारे, प्रभाकर कांबळे, संतोष सोनवणे, माणिक साळवे, मोहन बागुल आदींच्या सह्या आहेत.