वेतन आयोगासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:31 IST2019-08-22T00:30:45+5:302019-08-22T00:31:16+5:30

राज्यातील महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,

 Statistics for the Pay Commission | वेतन आयोगासाठी साकडे

वेतन आयोगासाठी साकडे

सातपूर : राज्यातील महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील महापालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांना शासन निर्णयानुसार त्वरित सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले, जयराम महाजन, मोतीराम पवार, धर्मेंद्र बागुल, विठ्ठल नागरे, राजेंद्र म्हसदे, सतीश गोमासे, शिरीष पाडवी, राजीव दातीर, नितीन नानकार, पद्माकर बागड, प्रमोद पाटील यांनी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Web Title:  Statistics for the Pay Commission