शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

विशेष पोलिस महानिरीक्षकांना पोलिस पाटील संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 7:16 PM

नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटलांना उपचार मिळावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाटलांच्या वारसांना ५० लाख रूपये विमा सरंक्षण मिळावे आदी मागण्यांचे निवेदन पोलिस पाटलांच्या उपस्थितीत नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना देण्यात आले.

ठळक मुद्देसर्व पोलीस पाटील यांच्या विम्याबाबत फॅक्सद्वारे शासनास माहिती दिली.

नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटलांना उपचार मिळावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाटलांच्या वारसांना ५० लाख रूपये विमा सरंक्षण मिळावे आदी मागण्यांचे निवेदन पोलिस पाटलांच्या उपस्थितीत नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना देण्यात आले.जिल्ह्यातील पोलीस पाटील कोरोना महामारीच्या संकटात अतिशय प्रामाणिकपणे काम करत असून कोरोना संक्र मनाने शहीद झालेल्या जिल्ह्यातील चेहडी तालुका निफाड येथील स्वर्गीय रु मने पाटील यांच्या वारसांना तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांना पन्नास लाख रु पये विमा संरक्षण मिळावे व नाशिक शहरात पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील कोरोना बाधित पोलीस पाटील यांना उपचार मिळावा या महत्वाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांचे नेतृत्वात नवनियुक्त पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना नुकतेच निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.याबाबत निवेदनाची दखल घेत दिघावकर यांनी शासन स्तरावर स्वर्गीय रु मने पाटील व सर्व पोलीस पाटील यांच्या विम्याबाबत फॅक्सद्वारे शासनास माहिती दिली. पोलीस पाटील यांच्या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांचेशी बोलून कोविड सेंटर बाबत लगेच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील सांगळे, उपाध्यक्ष संपत पाटील जाधव, नवनाथ पाटील, कैलास फोकणे आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Policeपोलिसgram panchayatग्राम पंचायत