विशेष पोलिस महानिरीक्षकांना पोलिस पाटील संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:03 IST2020-09-29T19:16:50+5:302020-09-30T01:03:27+5:30

नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटलांना उपचार मिळावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाटलांच्या वारसांना ५० लाख रूपये विमा सरंक्षण मिळावे आदी मागण्यांचे निवेदन पोलिस पाटलांच्या उपस्थितीत नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना देण्यात आले.

Statement of Police Patil Association to Special Inspector General of Police | विशेष पोलिस महानिरीक्षकांना पोलिस पाटील संघटनेचे निवेदन

पोलिस पाटलांच्या विविध मागण्यांचे निवेदन नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना देतांना चिंतामण पाटील-मोरे समवेत अशोक पाटील सांगळे, संपत पाटील जाधव आदी.

ठळक मुद्देसर्व पोलीस पाटील यांच्या विम्याबाबत फॅक्सद्वारे शासनास माहिती दिली.

नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटलांना उपचार मिळावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाटलांच्या वारसांना ५० लाख रूपये विमा सरंक्षण मिळावे आदी मागण्यांचे निवेदन पोलिस पाटलांच्या उपस्थितीत नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील पोलीस पाटील कोरोना महामारीच्या संकटात अतिशय प्रामाणिकपणे काम करत असून कोरोना संक्र मनाने शहीद झालेल्या जिल्ह्यातील चेहडी तालुका निफाड येथील स्वर्गीय रु मने पाटील यांच्या वारसांना तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांना पन्नास लाख रु पये विमा संरक्षण मिळावे व नाशिक शहरात पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील कोरोना बाधित पोलीस पाटील यांना उपचार मिळावा या महत्वाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांचे नेतृत्वात नवनियुक्त पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना नुकतेच निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
याबाबत निवेदनाची दखल घेत दिघावकर यांनी शासन स्तरावर स्वर्गीय रु मने पाटील व सर्व पोलीस पाटील यांच्या विम्याबाबत फॅक्सद्वारे शासनास माहिती दिली. पोलीस पाटील यांच्या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांचेशी बोलून कोविड सेंटर बाबत लगेच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.
शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील सांगळे, उपाध्यक्ष संपत पाटील जाधव, नवनाथ पाटील, कैलास फोकणे आदी सहभागी झाले होते.
 
Web Title: Statement of Police Patil Association to Special Inspector General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.