गौतम हिरण हत्या प्रकरणी पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:41 IST2021-03-13T18:41:07+5:302021-03-13T18:41:40+5:30
वाडीव-हे : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर (श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय जैन समाजाच्या वतीने वाडीव-हे पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि खुन्यांवर कडक कारवाई करावी, यासाठी पोलिसांना निवेदन देताना संजय बेदमुथा, डॉ. बोरा, नीलेश बेदमुथा, चेतन बेदमुथा, अजय बेदमुथा, संयम भंडारी, नितेश खिंवसरा आदी.
ठळक मुद्देहिरण यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
वाडीव-हे : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर (श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय जैन समाजाच्या वतीने वाडीव-हे पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गौतम हिरण यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संजय बेदमुथा, डॉ. एम. एम. बोरा, नीलेश बेदमुथा, सय्यम भंडारी, चेतन बेदमुथा, अजय बेदमुथा, नितेश खिंवसरा, कल्पेश बेदमुथा आदींच्या सह्या आहेत.