नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:11+5:302021-06-17T04:11:11+5:30
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन ग्रामपंचायतींचे नवनिर्मित नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये रूपांतर होऊन सहा वर्षं झालेली आहेत, परंतु ...

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन ग्रामपंचायतींचे नवनिर्मित नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये रूपांतर होऊन सहा वर्षं झालेली आहेत, परंतु शासनाकडून नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा, शर्ती, लाभ आदी मागण्या प्रलंबित आहेत. तत्कालीन ग्रामपंचायत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतमध्ये सरसकट समायोजन करण्यात यावे, तसेच त्यांची जुनी मागील सेवा ग्राह्य धरून पेन्शन लागू करण्यात यावी, पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे, सफाई विभागातील ठेका पध्दत रद्द करण्यात येऊन सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे तसेच वारसा हक्काने त्यांच्या वारसास नोकरीत सामावून घ्यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व अर्जीत रजेचा लाभ मिळावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हा सदस्य सुधाकर आहेर, तालुकाध्यक्ष सुरेश आहेर, वसंत आहेर, दत्तात्रेय बच्छाव, माणिक आहेर, सागर बच्छाव, अनिता साळुंके, हौसाबाई साळुंके, योगेश आहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या नीलिमा आहेर यावेळी उपस्थित होत्या.
कोट....
नवनिर्मित नगरपंचायत व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे.
_ नीलिमा आहेर, प्रवक्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस
फोटो - १६ देवळा नगरपालिका
नायब तहसीलदार विजय बनसोडे यांना मागण्यांचे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या नीलिमा आहेर, सुधाकर आहेर आदींसह देवळा नगरपंचायतीचे कर्मचारी.