प्रहार शेतकरी जनशक्ती पक्षातर्फे कांदाप्रश्नी प्रांतांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 23:05 IST2022-05-30T23:04:07+5:302022-05-30T23:05:14+5:30
चांदवड : येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा पिकासंदर्भात बाजारभावातील घसरण व विविध प्रश्नांसाठी चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना प्रहार शेतकरी जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा भावप्रश्नी निवेदन देताना गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण, राम बोरसे, सुरेश ऊशीर, संदीप महाराज जाधव आदी.
चांदवड : येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा पिकासंदर्भात बाजारभावातील घसरण व विविध प्रश्नांसाठी चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
त्यांनी प्रांतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याची बाजारभावातील चिंताग्रस्त करणारी घसरण त्यावर सरकारकडून जखमेवर मीठ चोळावे तशीच गत नाफेडच्या खरेदीतून शेतकऱ्यांबाबत चालू आहे. कांदा पिकाचा उत्पादन खर्च १८ ते २० रुपये किलोच्या आसपास असताना, बाजारात खरेदीसाठी शासनाच्या वतीने नाफेडच्या खरेदी ९ ते ११ रुपये प्रति किलो अशा दराने होत आहे.
कांदा बाजारभावात सरकारांनी ठोस पावले उचलली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय अणि विभागीय आयुक्त कार्यालय या प्रमुख प्रशासकीय कार्यालयावर घेराव डेरा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
या शिष्टमंडळात प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, राम बोरसे, सुरेश ऊशीर, संदीप महाराज जाधव, गणेश वक्ते, हरिभाऊ सोनवणे, चंद्रकांत जाधव, साहेबराव गांगुर्डे, समाधान भोकनळ, दीपक चव्हाण, अशोक तिडके, संदीप देवरे, वैभव गांगुर्डे, कैलास पगार आदींचा समावेश होता .