महिला व बालकल्याण मंत्रयांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:16 IST2020-09-18T21:08:52+5:302020-09-19T01:16:47+5:30
मांडवड : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षीका संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांची मुंबई कार्यलयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना मंगला भवर, वैशाली सोनवणे, लता काळे, विनया महाले आदी.
ठळक मुद्देराज्यातील रिक्त आसलेल्या पर्यवेक्षिकांचे पदे भरण्यात यावी
मांडवड : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षीका संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांची मुंबई कार्यलयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली.
एकात्मिक बालविकास योजनेआंतर्गत काम करणार्या पर्यवेक्षिका यांना पदोन्नती देण्यात यावी व वेतनात असणार्या त्रुुटी लवकरात लवकर भरून काढाव्यात. त्याचप्रमाणे राज्यातील रिक्त आसलेल्या पर्यवेक्षिकांचे पदे भरण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा मंगला भवर, वैशाली सोनवणे, विनया महाले, लता काळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.