दिव्यांगांची दिवाळी गोड करण्यासाठी मनमाड पालिका प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:51 IST2020-10-28T17:47:20+5:302020-10-28T17:51:20+5:30
मनमाड : गेल्या चार वर्षांपासून मनमाड नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना ठरावीक राखीव निधी देण्यात येत आहे. या वर्षीही ५ टक्के राखीव निधी दिवाळीच्या आत दिव्यांगांच्या बॅंक खात्यात थेट जमा करावा, असे निवेदन दिव्यांग बांधवांकडून मनमाड पालिका प्रशासनाला देण्यात आले.

मनमाड येथे पालिका प्रशासनाला निवेदन देताना संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर, जाफर शहा, सुरेश गांगुर्डे, सारिका पगारे, दत्तात्रय सानप आदी.
मनमाड : गेल्या चार वर्षांपासून मनमाड नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना ठरावीक राखीव निधी देण्यात येत आहे. या वर्षीही ५ टक्के राखीव निधी दिवाळीच्या आत दिव्यांगांच्या बँक खात्यात थेट जमा करावा, असे निवेदन दिव्यांग बांधवांकडून मनमाड पालिका प्रशासनाला देण्यात आले.
संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर यांच्या नेतृत्वाखाली मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष जाफर शहा, तालुका सचिव सुरेश गांगुर्डे, शहर सचिव सारिका पगारे, उपाध्यक्ष दत्तात्रय सानप, कोषाध्यक्ष असलम मुलाणी, शिला हरकल, उपेंद्र पाल, प्रणव हरकल, चेतन सोनवणे, अर्चना आव्हाड, योगेश रानडे आदी उपस्थित होते.