े राज्य महिला आयोगातर्फे जुलैमध्ये महिला वकिलांची परिषद : शहा

By Admin | Updated: May 20, 2014 00:32 IST2014-05-19T23:51:11+5:302014-05-20T00:32:39+5:30

महिला सबलीकरणाच्या निर्णयांबाबत पाठपुरावा : परिषदेसाठी राज्यनिहाय दौरे

State Women's Commission's Council for Women's Advisory in July: Shah | े राज्य महिला आयोगातर्फे जुलैमध्ये महिला वकिलांची परिषद : शहा

े राज्य महिला आयोगातर्फे जुलैमध्ये महिला वकिलांची परिषद : शहा

महिला सबलीकरणाच्या निर्णयांबाबत पाठपुरावा : परिषदेसाठी राज्यनिहाय दौरे
नाशिक : राज्यात महिलांवरील अन्याय- अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यादृष्टीने करावे लागणारे विविध उपाय, महिलांना दिले जाणारे संरक्षण यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जुलै महिन्यात महिला वकिलांची परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी दिली़ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसह पाच सदस्यांनी सोमवारी जिल्हा न्यायालयातील आयटी लायब्ररीमध्ये महिला वकिलांची भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी त्या बोलत होत्या़
जिल्हा न्यायालयात महिला वकिलांशी चर्चा करताना शहा म्हणाल्या की, महिलांवर केवळ घरगुती अत्याचार होतात असे नाही़ कामाच्या ठिकाणीही त्यांना अन्यायाला सामोरे जावे लागते़ महिलांना संरक्षणासाठी कायद्यात तसेच मंत्रिमंडळातही विविध तरतुदी केल्या जातात; मात्र त्यांचे पुढे काय होते, प्रत्यक्षात मदत मिळते का याबाबत पाठपुरावा केला जात नाही़ त्यामुळेच प्रत्येक महिलेला संरक्षण कसे मिळेल, कायदेशीर अंमलबजावणी कशी होईल या दृष्टीने विचारमंथन करण्यासाठी २६ जुलै रोजी मुंबईमध्ये महिला वकिलांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे़
महिलांना संरक्षण कसे मिळेल याबाबत महिला वकिलांकडून मार्गदर्शन तसेच सल्ले घेतले जाणार आहेत़ यासाठी राज्यातील विविध न्यायालयांतील महिला बार असोसिएशनशी चर्चा केल्या जाणार असल्याचेही शहा म्हणाल्या़ त्यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ, आशा भिसे, विजया बांगडे, ज्योत्स्ना विसपुते, उषा कांबळे यादेखील उपस्थित होत्या़ त्यांचे स्वागत नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ नितीन ठाकरे यांनी केले़
यावेळी नाशिक वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड़ बाळासाहेब आडके, महिला फ ाउंडेशन अध्यक्ष ॲड़ इंद्रायणी पटणी, ॲड़ अपर्णा पाटील, ॲड़ मंगला शेजवळ, ॲड़ अंजली पाटील, ॲड़ शारदा थोरात, ॲड़ सोहराब शेख आदिंसह महिला व पुरुष वकील उपस्थित होते़ ॲड़ हेमंत गायकवाड यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)

Web Title: State Women's Commission's Council for Women's Advisory in July: Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.