आजपासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा
By Admin | Updated: May 29, 2014 00:44 IST2014-05-29T00:21:25+5:302014-05-29T00:44:31+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ३१ वी सबज्युनिअर व ४१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

आजपासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा
नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ३१ वी सबज्युनिअर व ४१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन महापौर ॲड. यतिन वाघ यांच्या हस्ते होणार असून यावेळी पालिकेचे प्रभारी आयुक्त संजीव कुमार, शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
येत्या रविवारपर्यंत होणार्या स्पर्धेच्या दोन्ही गटातून रोज ३० प्रकारच्या स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी शालेय आशियाई व राष्ट्रीय स्पर्धेतील सुमारे १२०० जलतरणपटू सहभागी होणार आहेत. वॉटर पोलोमध्ये मुलांचे आठ तर मुलींचे चार संघ सहभागी झाले आहेत. डायव्िंहगमध्ये ४० मुले तर ३० मुली सहभागी आहेत.