कलावंत विचार मंचतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:36 IST2019-04-01T00:35:58+5:302019-04-01T00:36:16+5:30

कलावंत विचार मंच संस्था व कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कलावंत, लेखक आदिंना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 State-level award ceremony organized by Artist Ideas Forum | कलावंत विचार मंचतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा

कलावंत विचार मंचतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा

नाशिक : कलावंत विचार मंच संस्था व कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कलावंत, लेखक आदिंना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आयएमए सभागृह, शालिमार चौक येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सुर्वे कवी कट्टाचे अध्यक्ष भीमराव कोते पाटील, अभिनेता दिग्दर्शक सोमनाथ मुठाळ, मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौंदर्य पुरस्कार प्राप्त शिल्पी अवस्थी व ग्लोबल इंटरनॅशनल ब्यूटी पुरस्कार मुक्ता मिस्त्री, शाहीर मुक्तानंद जगताप, गायक पी. कुमार धनविजय आदि उपस्थत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे उपस्थित होते. यावेळी भीमराव कोते पाटील म्हणाले की, आताचा काळ हा संक्रमण अवस्तेतून जात आहे, अशा काळात कलावंतांनी सजग राहून कार्य करावे. याप्रसंगी मुक्तानंद जगताप यांनी उठा रे आता हे गीत सादर केले. अध्यक्षीय समारोपात सचिन शिंदे यांनी सांगितले की, समाज एकसंघ रहावा म्हणून कलावंतांना सतत कार्यरत राहावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी कलावंत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त कलावंत
पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील कलावंत सत्यनारायण जाधव, प्रेमानंद काटनक, भास्कर शेवंतकर, सदानंद बोरकर, शहाजी भोसले, महेश सोनवणे, अल्ताफ शेख, गणेश हरिकवार, अजय बोदणे, बाळासाहेब खोत, राजेंद्र टाचतोडे, राधाबाई खोडे, दीपाली देशमाने, अशोक सूर्यवंशी, आर्यन कासारे, बाळासाहेब काकडे, मधुकर जाधव, जनार्दन कदम, दीपाली सोसे, लक्ष्मी लहाने, नीलेश वाकचौरे आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Web Title:  State-level award ceremony organized by Artist Ideas Forum

टॅग्स :Nashikनाशिक