शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

फेब्रुवारीत वकिलांची राज्यस्तरीय परिषद; इमारतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:16 PM

महाराष्टÑ व गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायलयात होणार असल्याची घोषणा अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केली. या परिषदेला सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित राहणार असून, परिषदेच्या दुसऱ्या दिवशी न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत घोषणा : सर न्यायाधीश बोबडे उपस्थित राहणार

नाशिक : महाराष्टÑ व गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायलयात होणार असल्याची घोषणा अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केली. या परिषदेला सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित राहणार असून, परिषदेच्या दुसऱ्या दिवशी न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.नाशिक बार असोसिएशनची वार्षिक सर्वसधारण सभा सोमवारी (दि.२०) एचआरडी सेंटरमध्ये खेळीमेळीत तर काहीशी गोंधळाच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीस ठाकरे यांनी नाशिक बार असोसिएशनच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी जेमएफसी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आहुजा, सचिव अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. श्यामला दीक्षित, अ‍ॅड. संजय गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद््घाटन होणार आहे. परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह राज्यभरातील वकील हजेरी लावणार आहे. नाशिक बार असोसिएशनच्या ३३ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. त्यामध्ये वाढ झाली असून, आता ३८ लाख ७४ हजारांच्या ठेवी आहेत. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांच्या दोन संघटना आहेत. नाशिक बार असोसिएशन ही संघटना नोंदणीकृत असून, महानगर अ‍ॅडव्होकेट संस्था ही अधिकृत नसल्याचे ठाकरे म्हणाले. याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक करू नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गदारोळसभा खेळीमेळीत सुरू असताना अ‍ॅड. लीलाधर जाधव यांनी व्यासपीठाजवळ येत माइक घेऊन भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रश्नातून मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मज्जाव करण्यात आला. यावेळी त्यांच्या हातातून माइक काढून घेतला असता जाधवदेखील आक्रमक झाले, त्यांनी पुन्हा माइक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पहिल्या रांगेत बसलेल्या ज्येष्ठ वकिलांनी उठून जाधव यांची समजूत काढत त्यांना बाजूला केले. यावेळी सभागृहात एकच गोंधळ उडाल्याने गदारोळ निर्माण झाला. यानंतर सभेच्या पटलावर ठेवण्यात आलेले विषय पूर्ण होत नाही, तोपर्यंत ऐनवेळी कोणीही प्रश्न मांडू नये, यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आपले मुद्दे मांडावे, अशी सूचना केली गेली. दरम्यान, अ‍ॅड. झुंजार आव्हाड यांनीही मुस्कटदाबी हाते असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांवर केला.

टॅग्स :advocateवकिल