शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

नाशिक, नागपूरच्या मेट्रोसाठी राज्य सरकार आर्थिक वाटा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:13 IST

नाशिक- केंद्र सरकारने नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवे करीता केलेल्या तरतूदीनंतर राज्य सरकार आपला वाटा देईल काय याबाबत शंका असली तरी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मेट्रो करीता राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल असे त्यांनी आज नाशिकमध्ये सांगितलं.

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणानाशिकच्या निअेा मेट्रोला पाठबळ

 

नाशिक- केंद्र सरकारनेनाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवे करीता केलेल्या तरतूदीनंतर राज्य सरकार आपला वाटा देईल काय याबाबत शंका असली तरी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मेट्रो करीता राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल असे त्यांनी आज नाशिकमध्ये सांगितलं.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या १ फेब्रुवारीस केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यात राज्य सरकारचा देखील वाटा असणार आहे. परंतु  राज्य सरकार आर्थिक सहभाग देईल का, याबाबत शंका घेतली जात होती.

कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी तुट आली आहे. मात्र त्यानंतरही मध्यममार्ग काढून जिल्ह्यांना विकासासाठी निधी दिला आहे. त्यासाठी लोकसंख्या आणि विकास यांचे सूत्र ठरवून निधी वाटप निश्चीती करण्यात आली आहे. त्या अंतर्गतच नंदुरबार जिल्ह्याला १३० कोटी, जळगाव जिल्ह्याला ४०० कोटी, धुळे जिल्ह्याला २१० कोटी तर नाशिक जिल्ह्यासाठी ४७० कोटी रूपयांचा नियोजन निधी मंजुर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याला विविध शीर्षांखाली ८७० कोटी रूपयांचा निधी देताना नियोजन वाटपात समानता आणण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी कर्ज मुक्ती योजना राबवली तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून शेतकऱ्यांना तीन लाख रूपयांचं कर्ज अवघे देान टक्के व्याजाने देण्यात आले असे सांगतानाच अजित पवार यांनी दिल्लीत कृषी कायद्यावरून सुरू असलेले शेतकरी आंदोलन थांबविण्यासाठी केंद्र शासनाने त्वरीत हस्तक्षेप करावा, त्याच बरोबर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोन पावलं मागे घ्यावीत असं आवाहनही पवार यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारAjit Pawarअजित पवारMetroमेट्रो