शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:51 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात

ठळक मुद्देजातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूतविधान परिषदेसाठी आघाडीचा मेळावा

नाशिक : भीमा-कोरेगाव असो वा औरंगाबादची दंगल असो, ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, या सर्व घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीस देखील हतबल होत असल्याची टिका राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात होते, प्रत्यक्षात हे सरकार नको असे म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली असून, समाजातील प्रत्येक घटकाची सरकारने फसवणूक केल्याची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे आता हे सरकार घालविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, जीएसटीमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले, महिलांवर अत्याचार होत आहे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जात आहे. पोलीस भरतीत भ्रष्टाचार होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर हिमांशू रॉय सारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी आत्महत्या करू लागले आहेत. नगर जिल्ह्यात दिवसा ढवळ्या खून खराबा होत असून, नागपुरात सात दिवसात १२ जणांची हत्या करण्यात आली आहे. आपल्या राजकीय जीवनात ३२ वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती आपण पाहिल्याचेही पवार म्हणाले.राज्यात १४०० कोटी तूर सडत पडली असून नवीन तूर कोठे साठवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. देशाचा पंतप्रधान निवडणूक प्रचारात खालच्या पातळीवर जावून भाषणे करीत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वत्र भगवेकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करू लागली आहे. विरोधकांना खोट्या नाट्या गुन्ह्यात अडकविण्याचे मोक्का, तडीपारी करण्याचे उद्योग केले जात असून, भुजबळ सारख्या नेत्यांना विनाकारण २६ महिने तुरूंगात अडकविण्यात आले आहे. भाजपाची वाटचाल सत्तेतून पैसा व पैशांतून दहशत व पुन्हा दहशतीच्या माध्यमातून सत्ता अशा प्रकारे होत असून, असे सरकार आजवर पाहिले नसल्याची टिकाही अजित पवार यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक