राज्य सायकल पोलोत नाशिक अंतिम फेरीत

By Admin | Updated: December 14, 2014 01:38 IST2014-12-14T01:37:12+5:302014-12-14T01:38:27+5:30

राज्य सायकल पोलोत नाशिक अंतिम फेरीत

State Cycle PoloT Nashik in the final round | राज्य सायकल पोलोत नाशिक अंतिम फेरीत

राज्य सायकल पोलोत नाशिक अंतिम फेरीत

  नाशिक : आॅल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ज्यूनिअर व सिनिअर गटाच्या मुलींच्या सायकलपोलो स्पर्धेत नाशिकच्या संघाने दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे़ अंतिम सामना नाशिकविरुद्ध वाशिम संघात रंगणार आहे़ छत्रपती स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सब ज्यूनिअर व सिनिअर गटाचे सामने रंगले़ सब ज्यूनिअर गटात वाशिमने ठाण्याचा ८-४ असा पराभव करत अंतिम फे री गाठल तर नाशिकने नागपूरचा ४-३ असा पराभव करत ही फे री गाठली़, तर सिनिअर गटात वाशिमने सांगलीचा तर नाशिकने परभणीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली़ या दोन्ही गटांचे अंतिम सामने सकाळी ११ वाजता रंगणार आहेत़ सब ज्यूनिअर गटाचा आजचा निकाल याप्रमाणे - वाशिम विजयीविरुद्ध कोल्हापूर ७ - २, गोंदिया विजयीविरुद्ध सांगली ४ -०, परभणी विजयीविरुद्ध औरंगाबाद ४ - १, ठाणे विजयीविरुद्ध लातूर ५-२, नागपूर विजयीविरुद्ध यवतमाळ ६-३, बीड विजयीविरुद्ध सातारा २-१, नाशिक विजयीविरुद्ध जालना ५-१, अहमनगर विजयीविरुद्ध मुंबई ४-१, वाशिम विजयीविरुद्ध ठाणे ८-४, नाशिक विजयीविरुद्ध नागपूर ५-३़ सिनिअर गट - वाशिम विजयीविरुद्ध गोंदिया ७-५, सांगली विजयीविरूद्ध कोल्हापूर ४-३, परभणी विजयीविरुद्ध सातारा ४-२, नाशिक विजयीविरुद्ध मुंबई ६-२, अहमदनगर विजयीविरूद्ध लातूर ५-२, औरंगाबाद विजयीविरुद्ध यवतमाळ ६-४, नागपूर विजयीविरुद्ध जालना ६-०, ठाणे विजयीविरुद्ध बीड ३-१, नाशिक विजयीविरुद्ध परभणी ५-४, वाशिम विजयीविरुद्ध सांगली ८-२, अहमदनगर विजयीविरुद्धऔरंगाबाद ७-५, नागपूर विजयीविरुद्ध ठाणे ६-४.

Web Title: State Cycle PoloT Nashik in the final round