बनावट कागदपत्रं सादर करून स्टेट बँकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 00:21 IST2022-05-25T00:21:29+5:302022-05-25T00:21:29+5:30
पिंपळगाव बसवंत : शेती कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन बँकेत सादर करुन १४ लाख ८७,००० रूपयांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामचंद्र खोडे वय वर्षे ५२ राहणार जोपूळ रोड पिंपळगाव बसवंत असे फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बनावट कागदपत्रं सादर करून स्टेट बँकेची फसवणूक
पिंपळगाव बसवंत : शेती कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन बँकेत सादर करुन १४ लाख ८७,००० रूपयांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामचंद्र खोडे वय वर्षे ५२ राहणार जोपूळ रोड पिंपळगाव बसवंत असे फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
फसवणूक करणारा संशयित रामचंद्र खोडे याने स्टेट बँक ऑफ इंडिया ०५५३९ शाखा पिंपळगाव ब. यांचेकडून शेती कर्ज मिळविण्याच्या हेतूने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन ते खोटे आहे असे माहीत असताना देखील ते खरे आहे असे भासवून अप्रामाणिकपणे कर्ज प्रकरण बँकेत सादर करुन शेती कर्ज एकूण १४,८७,००० रूपये
मिळवून बँकेची फसवणूक केली. हे बँकेच्या लक्षात येताच बँकेचे शाखा अधिकारी दत्तात्रय किसन टाके यांनी संशयित आरोपी कैलास रामचंद्र खोडे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयातून हे प्रकरण सीआरपीसी होऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. त्यानुसार पिंपळगाव पोलीस ठाण्यात रामचंद्र खोडे यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहे.