राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन
By Admin | Updated: December 26, 2014 00:18 IST2014-12-26T00:11:06+5:302014-12-26T00:18:45+5:30
राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन

राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन
नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित बाराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन नाट्यलेखिका शैलजा औटी व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रतिनिधी अजय पाटील, अभिनेते किरण भालेराव, विवेक अहिरे, स्पर्धेच्या परीक्षक स्मिता घारपुरे (मुंबई), ज्ञानेश्वर भोकरे (अकोला), मयूर देशमुख (पुणे), स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव आदि व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार अजय पाटील, ज्येष्ठ रंगभूषाकार माणिक कानडे व रवि रहाणे यांनी केला.
प्रारंभी ‘बागेश्री’ वाद्यवृंदाने नांदी सादर केली. शर्वरी पद्मनाभी, शताक्षी लोणकर, वेदश्री करंजीकर यांनी गायन केले. चारुदत्त दीक्षित (संवादिनी), सुधीर करंजीकर (तबला) यांनी संगीतसाथ केली. त्यानंतर नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भाग्यश्री काळे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या सहसमन्वयक मीना वाघ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)