कानडी मळा व्यायामशाळेत लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:10+5:302021-05-08T04:14:10+5:30
वाजे युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर सिन्नर : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर माजी ...

कानडी मळा व्यायामशाळेत लसीकरण केंद्र सुरू करा
वाजे युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
सिन्नर : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. ८) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते किरण खाडे यांनी दिली. कोरोनासारख्या भयंकर आजारात राज्यभरात रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे माजी आमदार वाजे यांनी तालुक्यातून जास्तीतजास्त तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा निषेध
सिन्नर : भारतीय जनता पक्ष सिन्नर शहर शाखेच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सोनल लहामगे, ओबीसी मोर्चा युवा जिल्हाध्यक्ष मनोज सिरसाठ, उपाध्यक्ष शरद जाधव, चिटणीस गणेश क्षीरसागर, प्रियांका सिरसाट, वाल्मिक जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सिन्नरला सॅनिटायझर व मास्क वाटप
सिन्नर : इंडिया बुल्स कोविड केअर सेंटर येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका यांना बारागावपिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांच्यातर्फे हॅण्डग्लोज, मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, वैद्यकीय अधिकारी डॉ.लहू पाटील यांच्याकडे साहित्य सुपुर्द करण्यात आले.
कडक निर्बंध हरवले गर्दीत
सिन्नर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून राज्यभर कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजीपाला व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोरोनाच्या फैलावाला निमंत्रण मिळते आहे. शासनाने घालून दिलेले कडक निर्बंध जणू काही गर्दीत हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नांदूरशिंगोटेत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरातील अनेक गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. हे मोकाट कुत्रे शहरी भागातून आणून सोडले असल्याची जोरदार चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये ऐकावयास मिळत आहे. रस्त्यावर हे बिनधास्त फिरून नागरिकांवर मोठी दहशत निर्माण करीत आहेत.