सोग्रस ते नाशिक पायी मोर्चास प्रारंभ
By Admin | Updated: August 2, 2016 01:02 IST2016-08-02T01:01:58+5:302016-08-02T01:02:09+5:30
सोग्रस ते नाशिक पायी मोर्चास प्रारंभ

सोग्रस ते नाशिक पायी मोर्चास प्रारंभ
आंदोलन : महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचारी संघटनासोग्रस : महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग -३ व वर्ग -४ कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोग्रस ते नाशिक येथील अदिवासी विकास विभाग कार्यालयापर्यंत हजारो मोर्चाकऱ्यांनी आज पायी मोर्चा आंदोलनास सुरुवात केली.
संघटनेचे अध्यक्ष रितेश
ठाकूर यांनी सोग्रस येथील मोर्चकरांच्या जाहीर सभेत सर्व आश्रमशाळेतील रोजंदारी, तासिका, कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अदिवासी विकास विभागाअंतर्गत सुरू असलेल्या वर्ग -३ वर्ग ४ ची भरतीप्रक्रिया तत्काळ बंद करावी, तासिका व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत भरती व बदलीप्रक्रिया कोणत्याही विभागात राबवू नये, रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांची सेवा सुरक्षित करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रितेश ठाकूर यांनी दिली.
दरम्यान, सोमवारी दुपारी २ वाजता अदिवासी विकास विभाग नाशिकचे सहआयुक्त पानमंड व गायकवाड यांनी मोर्चेकरांची भेट घेतली. मागण्याविषयी मंत्रिमहोदयासमवेत तारीख घेऊन चर्चेची तयारी दर्शवली. आश्वासने देऊन बोळवण केली जाते, प्रमुख मागण्यांविषयी काहीही कार्यवाही होत नाही. सोग्रस (ता. चांदवड) ते नाशिक आदिवासी विकास भवनात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. नाशिक येथील आत्मदहन आंदोलनास नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे, गडचिरोली, चंद्रपूर, डहाणू, धारणी, नाशिक आदि जिल्ह्यांतील प्रतिनिधी, कर्मचारी, महिला, पुरुष सामील झाले आहे. (वार्ताहर)