घोटीत रस्ता दुरुस्तीला सुरुवात
By Admin | Updated: October 24, 2016 23:27 IST2016-10-24T23:27:30+5:302016-10-24T23:27:54+5:30
दखल : नागरिकांमध्ये समाधान

घोटीत रस्ता दुरुस्तीला सुरुवात
घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात प्रवेश होणाऱ्या सर्व मार्गांवरील खड्ड्यांच्या दयनीय अवस्थेमुळे जनता प्रक्षुब्ध झाली होती. याबाबत लोकमतने पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम सुरू झाल्याने घोटीसह तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. घोटी शहराच्या प्रवेशद्वारावरील मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे वाढल्याने वाहनधारक आणि तालुक्यातील नागरिक संतापले होते. छोटे-मोठे अपघात होत असल्याने नागरिकांच्या संतापात वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर शिवा काळे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करून पाठपुरावा केला होता. यावेळी घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, गोरख बोडके, विठ्ठल वालतुले, मोहन काळे, प्रवीण भागवत, रवींद्र तारडे, जालिंदर काळे, राजेंद्र सुतार, चंद्रशेखर देशमुख आदि उपस्थित होते. (वार्ताहर)