शिवजयंतीच्या तयारीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:53 IST2020-02-12T22:24:57+5:302020-02-12T23:53:51+5:30
शिवजयंती आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील विविध मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून कॅम्प, मोसमपूल, सटाणा नाका परिसर भगवामय केला जातो. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील मंडळांसह शिवप्रेमींनी बैठका घेऊन रूपरेषा ठरविल्या. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मालेगावी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती.
मालेगाव : शिवजयंती आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील विविध मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून कॅम्प, मोसमपूल, सटाणा नाका परिसर भगवामय केला जातो. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील मंडळांसह शिवप्रेमींनी बैठका घेऊन रूपरेषा ठरविल्या. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कॅम्परोड, सोमवार बाजार, रावळगाव नाका यांसह विविध भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. कलाकुसर केलेल्या अतिशय सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.