म्हाळसाकोरेत नवरात्रोउत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:01 IST2018-10-11T17:00:26+5:302018-10-11T17:01:05+5:30
सायखेडा: म्हाळसाकोरे येथील ग्रामदैवत व खंङेरायाची दुसरी पत्नी म्हाळसादेवीचे आजोळ म्हणून ओळख असलेल्या म्हाळसादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरूवात झाली आहे.घटस्थापना करून अनेक महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस घटी बसलेल्या आहेत.नवरात्रोत्सव काळात देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन पंचकमिटिने केले आहे.

म्हाळसाकोरेत नवरात्रोउत्सवास प्रारंभ
सायखेडा:
म्हाळसाकोरे येथील ग्रामदैवत व खंङेरायाची दुसरी पत्नी म्हाळसादेवीचे आजोळ म्हणून ओळख असलेल्या म्हाळसादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरूवात झाली आहे.घटस्थापना करून अनेक महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस घटी बसलेल्या आहेत.नवरात्रोत्सव काळात देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन पंचकमिटिने केले आहे.
म्हाळसाकोरे गावाचे नाव हे म्हाळसादेवी व शिवाला साकारा देवी यांच्या नावावरूनच पडलेआहे.अशी आख्याइका आहे.या नवरात्र काळात प्रत्येक घरातुन एक घट मंदिरात बसविला जातो.व त्या घटाला रोज सकाळ संध्याकाळ माळ व तेल वाहिले जाते.याच काळात गावातील गावकरी वारकऱ्यांसाठी पगंती घेतात व शेवटच्या दिवशी म्हणजे दसºयाला महाप्रसाद असतो.यासाठी अनेक लोक इच्छुक असतात मग त्यात चिठ्या टाकुन लहान मुलाच्या हस्ते एक चिठ्ठी काढुन त्या व्यक्तीला महाप्रसादाची पगंत दिली जाते. शेवटच्या दिवशी संध्याकाळी प्रसिध्द भारूड असत .
याच काळात देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्तजन अनेक राज्यातुन व महाराष्ट्रातुन येत असतात त्यांत गुजरात कर्नाटक मध्यप्रदेश व राज्यस्थान या राज्यातील भाविक नवरात्रांत व वर्षभरही दर्शनासाठी े येत असतात.