राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांना प्रारंभ
By Admin | Updated: November 22, 2014 23:49 IST2014-11-22T23:49:37+5:302014-11-22T23:49:59+5:30
यजमान महाराष्ट्राची पराभवाने सुरुवात

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांना प्रारंभ
नाशिक : जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आयोजित केलेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेस आज उत्साहात प्रारंभ झाला़ उद्घाटनाच्या सामन्यातच पराभव पत्कारावा लागल्याने यजमान महाराष्ट्राची खराब सुरुवात झाली़ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष रमेश शानबाग व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले़ महाराष्ट्राची कप्तान सुधीक्षा नायर हिने खेळाडूंना शपथ दिली़ प्रारंभी खेळाडूंचे शानदार संचालन झाले. याप्रसंगी राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे संचालक कार्लोस बोराटा, नगरसेवक संजय साबळे, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष परवेज पिरजादे, जाकीर सय्यद, समीर घोडके, राष्ट्रीय खेळाडू सुधीर माने, भारतीय बास्केटबॉल संघटनेचे मुकुट मेडी, शफिक शेख, राजेश पटेल, अशोक रंगीन,नंदिनी बसपा, रवि नायर आदि उपस्थित होते.