नाशिकही झळकणार स्टार्टअप नकाशावर
By Admin | Updated: July 5, 2017 00:23 IST2017-07-05T00:22:54+5:302017-07-05T00:23:11+5:30
नाशिक : भारत सरकारने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून, स्टार्टअप इंडिया व डिजिटल इंडिया असे उपक्रम सुरू केले आहे.

नाशिकही झळकणार स्टार्टअप नकाशावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत सरकारने निती आयोगाच्या माध्यमाने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून, स्टार्टअप इंडिया व डिजिटल इंडिया असे उपक्रम सुरू केले आहे. या धरतीवर गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांनी स्टेट स्टार्टअप अॅण्ड इनोव्हेशन पॉलिसी अमलात आणले आहेत. आता नाशिकला स्टार्टअप व्हिलेज स्थापित करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय प्रधान सचिवांकडे केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकही आता भारताच्या स्टार्टअप नकाशावर झळकणार आहे.
निती आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि महाराष्ट्रातील सर्व भागधारकांचे विचार व मते लक्षात घेता महाराष्ट्र शासन ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन अॅण्ड स्टार्टअप पॉलिसी २०१७’ तयार करीत आहे. मुंबई आणि पुणे येथे स्टार्टअप इकोेसिस्टीम उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नागपूर आणि औरंगाबाद येथे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. नाशिक येथे डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (डिस्क) आणि नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनआईसी) येथे इन्क्युबेशन सेंटर आहेत. तरी नागपूर आणि औरंगाबाद पूर्वी नाशिक येथे अॅक्स्लेटर स्थापित करणे शक्य असल्याचे खासदार गोडसे यांनी प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग यांना सुचविले होते.