कसबे सुकेणे उपबाजार आवारात द्राक्षमणी लिलावास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:21 IST2019-02-22T13:21:00+5:302019-02-22T13:21:18+5:30

कसबे सुकेणे :- पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कसबे सुकेणे उपबाजार आवारात परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीकरिता द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. 

Start the gardener and start a lilt in the adjoining suburban premises | कसबे सुकेणे उपबाजार आवारात द्राक्षमणी लिलावास प्रारंभ

कसबे सुकेणे उपबाजार आवारात द्राक्षमणी लिलावास प्रारंभ

कसबे सुकेणे :- पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कसबे सुकेणे उपबाजार आवारात परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीकरिता द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. यावेळी संचालक निवृत्ती धनवटे , रामभाऊ माळोदे , माजी संचालक सर्जेराव मोगल ,लक्ष्मण भंडारे, बाजीराव पाटील , नाना पाटील , रामराव भंडारे,विठ्ठल भंडारे, शिवाजी भंडारे,धनंजय भंडारे, सदाशिव शेवकर, सोपान नळे ,चंद्रकांत भोज , सचिन पाटील , मोतीराम जाधव, नानासाहेब भंडारे, सुदाम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.यावेळी बोलतांना सभापती दिलीप बनकर यांनी कसबे सुकेणे उपबाजार आवारात द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी द्राक्षमणी विक्र ीसाठी आणावे , व्यापाºयांनीही खरेदीचे व्यवहार उपबाजार आवारात करावे व व माल विक्र ी केल्यांनतर शेतकºयांना तत्काळ पेमेंट करावे , असे आवाहन केले. व्यापारी शौकत सय्यद , प्रकाश गडाख , सद्दाम पिंजारी , व्यापारी वसीम हकीम, रफिक हकीम,रशीद शेख, जाकीर शेख , सज्जाद हकीम तय्यब मणियार, दर्शन देशमुख यांनी यातसहभागी होऊन रोखीने पेमेंट देऊ व जास्तीत जास्त बाजारभाव देऊ असे आश्वासन दिले. यावेळी संदेश मोगल, पंकज भंडारे, आकाश भंडारे , चारु दत्त मोगल, प्रशांत ठाकरे , रमेश जाधव, रामदास भोज,राहुल जाधव, युवराज भंडारे, कैलास भंडारे, आदी उपस्थित होते.

Web Title: Start the gardener and start a lilt in the adjoining suburban premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक