बारागाव पिंप्री पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:29 IST2018-09-07T18:27:58+5:302018-09-07T18:29:03+5:30
बारागाव पिंप्री सह ६ गावे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करा अशी सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी योजनेचे ठेकेदार व अधिकारी यांना केली.

बारागाव पिंप्री पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा
सिन्नर : बारागाव पिंप्री सह ६ गावे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करा अशी सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी योजनेचे ठेकेदार व अधिकारी यांना केली.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात बारागावपिंप्रीसह ६ गावे पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी आमदार वाजे यांनी योजनेच्या कामाची माहिती घेतांनाच योजना तात्काळ सुरु करण्याच्या सूचना केल्या. सदर बैठकीमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील सरपंचांच्या अडचणी जाणून घेतांना वाजे यांनी ठेकेदार काळुंखे यांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ताकीद दिली. ज्या वाड्या- वस्त्या या योजनेत समाविष्ट नाहीत. त्या वाड्या वस्त्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने तातडीने सादर करावे असे बैठकीत ठरले.