शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कर्मचारी अपघातप्रकरणी तारांकित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:49 AM

बस दुरुस्त करीत असताना दोन बसमध्ये सापडून गंभीर जखमी झालेल्या अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या अपघात प्रकरणी राज्यातील पाच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नाशिक : बस दुरुस्त करीत असताना दोन बसमध्ये सापडून गंभीर जखमी झालेल्या अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या अपघात प्रकरणी राज्यातील पाच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी असा कोणताही प्रकार घडलाच नव्हता, अशी भूमिका घेणाºया अधिकाºयांवर आता उत्तर देण्याची वेळ आली आहे.ब्रेकडाउन झालेल्या बसच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक कर्मचाºयाला पाठवून बस दुरुस्त करणे अपेक्षित असताना डेपोतील प्रभारी अधिकाºयाने साळुंके नामक अतांत्रिक कर्मचाºयाला बस दुरुस्तीसाठी पाठविले आणि बसचे काम करीत असताना दोन बसच्या मध्ये सापडून सदर कर्मचारी गंभीर जखमी झाला. या प्रकरणाबाबत महामंडळातील सर्वच अधिकाºयांनी गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेबाबतची कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याची चर्चादेखील आहे. आता मात्र राज्यातील पाच आमदारांनी याप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे या घटनेतील गांभीर्य वाढले आहेच, शिवाय मनमानी करणाºया डेपोतील कथित अधिकाºयाचे प्रतापही यानिमित्ताने चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सदर घटना १५ एप्रिल रोजी जुने सीबीएस येथे घडली होती. या संदर्भात लोकमतने १९ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्धदेखील केले होते. असे असतानाही अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नव्हती. संबंधित कर्मचाºयाला तातडीने सुट्टी मंजूर करून त्यास घरी पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर पंधरा दिवसांत मंडळातील अधिकाºयांनी कुणाचीही चौकशी केली नाही की कुणावर ठपकादेखील ठेवला नसल्याने प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र आता थेट वाहतूक महाव्यवस्थापकांच्या स्वाक्षरीनेच घटनेबाबतचा खुलासा मागविण्यात आल्याने अधिकारी चांगलेच हबकले आहेत.अशी घडली होती घटनागेल्या १५ एप्रिल रोजी जुने सीबीएस बसस्थानकात एमएच१४/बीटी ०७०९ ही बस नादुरुस्त झाली होती. सदर बस डेपोत घेऊन येण्यासाठी डेपोतून एमएच४०/६२२७ ही बस पाठविण्यात आली. नादुरुस्त बस दुरुस्त करण्यासाठी डेपो क्ऱ १ मधील प्रभारी कारागिराने अतांत्रिक कारागीर ज्याला बस दुरुस्तीचा कोणताही अनुभव नाही अशा कर्मचाºयाला पाठविले. या ठिकाणी बस दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन्ही बसच्या मध्ये संबंधित अतांत्रिक कर्मचारी सापडल्याने तो जखमी झाला. या प्रकरणाची कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती. यावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता़जखमी कर्मचाºयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न४विधानमंडळाकडून विचारणा झाल्यानंतर नाशिक डेपोतील काही अधिकाºयांनी जखमी अतांत्रिक कर्मचारी साळुंखे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आज दिवसभर डेपोत सुरू होती. अधिकाºयांची कोणतीही चूक नसल्याचे लेखी संबंधित कर्मचाºयाकडून लिहून घेण्यासाठीचे अनेक प्रयत्न डेपोतील वरिष्ठांनी केले. या प्रकरणी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाºया पुढाºयांनादेखील मध्यस्थी करण्यात आले. मात्र जखमी कर्मचारी ठाम राहिल्याने अधिकारीही हतबल झाले.‘त्या’ प्रभारी कारागिराकडून ‘डिनर’४अतांत्रिक कर्मचाºयाच्या अपघात प्रकरणाचा प्रश्न विधिमंडळात गेल्यानंतर नाशिक डेपो क्रमांक १ मध्ये खळबळ उडाली. डेपोस्तरावर काम करणाºया अधिकाºयांनी काही राजकीय पुढाºयांशी संपर्क साधून सदर प्रकरणे मिटविण्यासाठी खलबते सुरू केल्याचे वृत्त आहे़ त्यासाठी डेपो आणि विभागीय कार्यालयातील काही कर्मचाºयांसाठी गंगापूररोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणावळीचा घाट घालण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMLAआमदार