सबस्टेशनसमोर ग्रामस्थांचा ठिय्या
By Admin | Updated: June 4, 2014 01:42 IST2014-06-04T01:41:47+5:302014-06-04T01:42:17+5:30
सबस्टेशनसमोर ग्रामस्थांचा ठिय्या

सबस्टेशनसमोर ग्रामस्थांचा ठिय्या
चाडेगाव : सामनगाव परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता जादा वेळ भारनियमन करण्यात येत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सबस्टेशनच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून भारनियमन ठरल्या वेळेप्रमाणे न करता अवेळी व जादा काळ करण्यात येत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. घटनास्थळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जोंधळे आले असता सामनगावचे सरपंच अनिल जगताप यांनी गाºहाणे मांडले. यावेळी जोंधळे यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. ठिय्या आंदोलनात उपसरपंच सचिन जगताप, सुभाष जगताप, नितीन जगताप, समाधान जगताप, चंद्रकांत जगताप, भाऊसाहेब जगताप आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)