तहसील कचेरीवर कर्मचार्यांचा मोर्चा
By Admin | Updated: June 3, 2014 01:41 IST2014-06-02T22:03:33+5:302014-06-03T01:41:07+5:30
येवला : पालिका मुकादमाला शिवीगाळ व मारहाण प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पालिका कर्मचार्यांनी येवला शहरातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार व प्रांत कार्यालयात निवेदन दिले.

तहसील कचेरीवर कर्मचार्यांचा मोर्चा
येवला : पालिका मुकादमाला शिवीगाळ व मारहाण प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पालिका कर्मचार्यांनी येवला शहरातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार व प्रांत कार्यालयात निवेदन दिले.
पालिकेचे मुकादाम श्रावण जावळे स्वच्छता विभागात असताना सेवानिवृत्त कर्मचारी परदेशी यांनी शिवीगाळ व मारहाण केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी परदेशी यांचेवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शहरातील पालिका कार्यालयापासून आझाद चौक- काळा मारुती रोड-गंगा दरवाजा मार्ग २१० कर्मचार्यांचा मोर्चा, येवला तहसील व प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.
संघटनेच्या पदाधिकार्यांनी याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेबाबत भाषणातून संशय व्यक्त केला. पालिका कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी शशिकांत मोरे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील व स्वच्छता निरीक्षक एस. टी. संसारे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या आशयाची भाषणे केली.
प्रांत कार्यालयात अधिकारी प्रकाश धर्माधिकारी व तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सोमनाथ खैरे यांनानिवेदन देण्यात आले. (वार्ताहर)