एकलहरेत बिबट्यासाठी लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:29 IST2019-02-25T00:28:56+5:302019-02-25T00:29:14+5:30
येथील शेतकरी केदू पाटील राजोळे यांच्या मळ्यात गुरु वारी सायंकाळी व रात्री बिबट्याचे बछड्यासह दर्शन झाल्याने येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे.

एकलहरेत बिबट्यासाठी लावला पिंजरा
एकलहरे : येथील शेतकरी केदू पाटील राजोळे यांच्या मळ्यात गुरु वारी सायंकाळी व रात्री बिबट्याचे बछड्यासह दर्शन झाल्याने येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. उसात दडी मारून बसलेला बिबट्या सावजासाठी कधी बाहेर येईल सांगता येत नाही. त्यामुळे येथील शेतकºयांनी वनखात्याला कळविले. वनखात्याच्या अधिकाºयांनी संबंधित ठिकाणाची पाहणी करून ज्या ठिकाणी बिबट्या रस्ता ओलांडून समोरच्या उसात गेला त्याच्या वाटेवर पिंजरा लावला.
यापूर्वीही हिंगणवेढे येथे उसाच्या बांधावर पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बरेच दिवस उलटूनही बिबट्याने हुलकावणी देत पिंजºयाच्या आसपास भटकंती केली. त्याच बिबट्याचे स्थलांतर एकलहरेत झाले असण्याची शक्यता गृहित धरून येथे त्वरित पिंजरा लावण्यात आला. पिंजºयात सावज म्हणून ठेवण्यासाठी येथील शेतकºयांनी शेळी विकत आणली आहे. आता तरी बिबट्या पिंजºयात अडकेल अशी आशा येथील शेतकरी बाळगून आहेत.