घरफोडीत भीमवाडीतील महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:03 IST2019-02-09T01:02:09+5:302019-02-09T01:03:08+5:30

चांदोरी येथील फॅब्रिकेशन दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या तीन महिलांना नाशिकच्या भीमवाडीतून नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Stabbing women in Bhimwadi | घरफोडीत भीमवाडीतील महिलांना अटक

घरफोडीत भीमवाडीतील महिलांना अटक

नाशिक : चांदोरी येथील फॅब्रिकेशन दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या तीन महिलांना नाशिकच्या भीमवाडीतून नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मंगल रमेश सोनवणे (४०), शारदा मोहन गरकडे (२८), मंदा दत्तू शारबिद्रे (४०, तिघी रा. भीमवाडी, गंजमाळ, भद्रकाली) अशी या महिलांची नावे असून त्यांनी संशयित मोईन अली हुसेन पठाण (रा. गंजमाळ) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे़ चांदोरी शिवारातील दीपक खर्डे यांच्या फॅब्रिकेशन अ‍ॅण्ड मोटार गॅरेजचे शटर उचकटून संशयित महिलांनी दुकानातील २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली होती़ याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन संशयित महिला दिसून आल्या़ पोलिसांनी या तिन्ही संशयित महिलांना भीमवाडीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीतील सामान व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १५ झेड २४६२) असा ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक आशिष आडसुळ, रवींद्र शिलावट, सुधाकर खरोले, नंदू काळे, राजू सांगळे, गोकूळ सांगळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, योगिनी नाईक यांनी ही कामगिरी केली़

Web Title: Stabbing women in Bhimwadi