आंदोलनाने एसटी थांबली

By Admin | Updated: December 17, 2015 22:33 IST2015-12-17T22:27:26+5:302015-12-17T22:33:14+5:30

आंदोलनाने एसटी थांबली

ST stopped the agitation | आंदोलनाने एसटी थांबली

आंदोलनाने एसटी थांबली

पेठ : महाराष्ट्र एस़ टी़ कामगार युनियन इंटकने आंदोलन सुरू केल्याने आगारातील बसेसची चाके स्थिरावली.सन १२ ते १६ चा करार रद्द करून कर्मचाऱ्यांना २५ टक्के वाढ मिळावी या व इतर मागण्यांसाठी चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला़ पेठ अध्यक्ष याकूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले़ यावेळी आगारातून एकही बस बाहेर पडू न दिल्याने प्रवाशांना खासगी वाहतूक व्यवस्थेची मदत घ्यावी लागली़ यावेळी याकुब शेख, छगन चारोस्कर, सागर सुबंध, विजय जाधव, शीतल रहाणे, डी़ पी़ पवार, पी़ एच़ माळगावे, पी़ एल़ भोये, व्ही़ के़ घुले आदि उपस्थित होते़




 

Web Title: ST stopped the agitation