एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:37 PM2020-09-24T22:37:46+5:302020-09-25T01:21:29+5:30

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेला पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतरही महामंडळाच्या उत्पन्नाच अपेक्षित भर पडलेली नाही. नाशिक विभागाचे उत्पन्न अद्यापही दररोज १७ ते १८ लाख इतकेच असल्याचे समजते.

S.T. The income of the corporation is low | एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच

एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच

Next
ठळक मुद्देप्रवाशांची पाठ : पुर्ण क्षमतेची मंजुरी तरीही परिस्थिती जैसे थे

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेला पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतरही महामंडळाच्या उत्पन्नाच अपेक्षित भर पडलेली नाही. नाशिक विभागाचे उत्पन्न अद्यापही दररोज १७ ते १८ लाख इतकेच असल्याचे समजते.

गेल्या १ सप्टेंबर पासून बसेस सुरू झाल्यानंतर महामंडळाचे आर्थिक चलन सुरू झाले. मात्र त्यांना अजूनही अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. दरररोज १ कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या नाशिक विभाग एस.टी महामंडळाला अजूनही तोट्यात सेवा दयावी लागत आहे. दररोज १ सुमारे एक लाख किलोमीटर धावणाºया बसेसच्या माध्यमातून संपुर्ण जिल्'ातून नाशिकला दररोज जवळपास १ कोटींचे उत्पन्न मिळत होते. परंतु बसेस सुरू झाल्यापासून दररोज केवळ १७ ते १८ लाख इतकेच उत्पन्न मिळत आ हे.

राज्य शासनाने महामंडळाला पुर्ण प्रवासी क्षमतेने बसेस सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आगोदर केवळ २० प्रवासी घेऊन धावणाºया बसेस जादा उत्पन्न देतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रवाशांकडून अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अजूनही महामंडळाचे उत्पन्नत जवळपास तेव्हढेच असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या १ ते २० सप्टेबर या कालावधीतील आकडेवारी पाहिली तर गेल्या वीस दिवसात १५ लाख १३ हजार किलोमीटर बसेस धावलेल्या असून त्या माध्यमातून केवळ तीन कोटी १९ लाख इतकेच उत्पन्न मिळालेले आहे.

कोरोनामुळे बंद झालेल्या बसेस सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु कर्मचाºयांना आता पुन्हा आर्थिक संकटाची चिंता भेडसावत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने या महिन्यातही वेतन मिळते की नाही याबाबत कर्मचारी साशंक आहेत.

प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना

महामंडळाने सर्वप्रकारची खबरदारी घेतली असल्याचा दावा केल्यानंतरही प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हांतर्गत आणि जिल्'ाबाहेरील प्रवासी बसेसला प्रवासी मिळत नसल्याने बसेस सुरू होऊनही उत्पन्न मात्र वाढत नसल्याचे एकुणच चित्र आहे. असे असतांनाही राज्य शासनाच्या आदेशानुसार अनेक सेवांसांठी बसेस पुरविल्या जात आहेत.

 

Web Title: S.T. The income of the corporation is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.